Posts

Showing posts from November, 2023

मुळव्याधीचे प्रकार कारणे उपाय

Image
* मूळव्याधाची विविध कारणे --* बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो. *मूळव्याधाची कारणे काय आहेत* १. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे २. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे  ३. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते  4. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.  ५. चुकिची आहार पध्दति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन  ६. बराच काळ एका जागी बसून राहणे.  ७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे  ८. अनुवंशिकता  ९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते. * मूळव्याध...