सोरायसिस वर उपचार सोरायसिसवरील उपचार
सोरायसिसची कारणे सोरायसिस वर उपचार सोरायसिसवरील उपचार सोरायसिस (Psoriasis) हा एक असा त्वचाविकार आहे, जो तुम्हाला हात, पाय, पाठीवर अथवा केसांमध्ये जाणवतो. जरी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसत असला तरी त्याचा गंभीर परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. या रोगामध्ये त्वचापेशीची अतिरिक्त आणि जलद गतीने वाढ होते. ज्यामुळे त्वचेवर लालसर पापुद्रे निर्माण होतात. काहींच्या त्वचेवर यामुळे लालसर चट्टे निर्माण होतात. त्वचेला प्रंचड खाज येते. काही संधोशनात असं आढळलं आहे की, सोरायसिस हा संक्रमणातून होणारा आजार नसून तो तुमच्या प्रतिकार शक्तीमध्ये होणाऱ्या बदलातून निर्माण होतो. आपल्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाऊन नवीन पेशी निर्माण होण्यासाठी जवळजवळ 28 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सोरायसिस झालेल्या लोकांमध्ये चार ते पाच दिवसांमध्ये नवीन पेशींची निर्मिती होते. ज्यामुळे त्वचेवर या नवीन त्वचापेशींचा थर जमा होऊ लागतो. पुढे त्याचे रूपांतर खाज, लालसरपणा, चट्टे यामध्ये होत जातं. सोरायसिस हा गंभीर त्वचा रोग असल्यामुळे याबाबत तुम्हाला आधीच सर्व काही माहीत असणं आवश्यक आहे. सोरायसिस लक्षणे (Pso...