सिझेरियन दरवाढ व लज्जागौरी
सिझेरियन दरवाढ व लज्जागौरी - वैद्य विश्वनाथ जाधव। सर्व सस्तन (गाय, कुत्री, गाढवीण इ.) प्राण्यात गर्भाशय असले तरी त्यांच्यात सिझेरियन प्रमाण नगण्य असल्याचे कारण प्रसवेला प्रसूतीसाठी टेबलावर झोपविले जात नाही व आडवे होऊनच प्रसूती कळा घेण्याचे बंधन नसते. जोवर महिलांना प्रसूती कळा आवडीनुसार घ्यायला स्वातंत्र्य होते सिझर दर नगण्य होता. आधुनिक वैद्यक (Modern medicine) शास्त्राने प्रसवेचा , इच्छेनुसार कळ घेण्याचा , “मुलभूत” अधिकार हिसकावून घेतला. प्रसवेला प्रसूती-टेबलावर (Obstetric table) आडवे पडून कळा घेण्याचा अलिखित नियम केला . आडवी पडलेली महिला नर्स व डॉक्टरला हाताळायला , तपासायला सोपी असते. ह्या सत्याचा उलगडा बी जे मेडिकल कोलेजच्या स्व. अनिल जुन्नरकर यांना मराठवाड्यात चाळीस वर्षापूर्वी गावात भटकताना झाला.Dr junnrkar was a Prof community Medicine in BJMC. मराठवाड्यातील महिला उभ्या अवस्थेत प्रसूती कळा घेऊन कमी वेळात, सहजतेने नैसर्गिकरीत्या प्रसूत होत असल्याचे त्यांना दिसले. कर्नाटकातील लज्जागौरी व वेरूळ लेण्यातील 21 क्रमांकाच्या गुफेत उभ्या अवस्थेतील माता बाळाला जन्...