Posts

Showing posts from February, 2023

मूळापासून जाणून घ्या मूळव्याधाविषयी.

Image
मूळापासून जाणून घ्या मूळव्याधाविषयी. सुमारे 60 टक्के लोक त्यांच्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मूळव्याधाने ग्रस्त असतात. आजकाल मूळव्याध (Piles) ह्या आजारावर औषध म्हणून लोकांची दिशाभूल केली जाते. आजच्या लेखातून आपण मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध किती प्रकारचा असतो?  मूळव्याध हा असा आजार आहे, जो खूप वेदनादायक आहे. ह्यामध्ये,  गुदद्वाराच्य ा म्हणजेच संडासच्या वाटेवर आत आणि बाहेर आणि गुदाशयच्या खालच्या भागात सूज येते. ह्यामुळे, गुदद्वाराच्या आत आणि बाहेर किंवा कोणत्याही एका ठिकाणी कोंब तयार होतात. हे कोंब कधीकधी आत राहतात, कधीकधी ते बाहेर येतात. रुग्णाला मूळव्याधाचे उपचार योग्य वेळी होणे खूप महत्वाचे आहे. मूळव्याधावर वेळीच उपचार न झाल्यास वेदना मोठ्या प्रमाणात वाढतात. तुम्हाला कदाचित माहीत असेल ही मूळव्याध हा एक अनुवंशिक रोग आहे. जर कुटुंबातील कोणाला हा त्रास ह्यापूर्वी झाला असेल तर पुढच्या पिढीतल्या व्यक्तीला होण्याची शक्यता आहे. जेव्हा मूळव्याध खूप जुना असतो तेव्हा तो भगंदर चे रूप धारण करतो ज्याला फिस्टुला (Fistula) असेही म्हणतात. त्यात असह्य वाटेल अ...

गाऊट, खुडरोग, युरीक अँसीड ची वाढ अथवा गाऊटचा संधिवात

Image
गाऊट, खुडरोग, युरीक अँसीड ची वाढ अथवा गाऊटचा संधिवात.....  रक्‍तातील बिघाड झाल्यामुळे होणार्‍या सांधेदुखीच्या प्रकारांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे गाऊटचा संधिवात. गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली होती हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. कारण हा सतत मांसाहार व्यसन करणाऱ्या अव्यवस्थित जीवनशैली असणाऱ्या ना होतो असे म्हंटले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. विविध कारणांनी ज्यावेळी रक्‍तातील प्युराईनच्या चयापचय क्रियेत बिघाड होऊन रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’ या घटकाचे प्रमाण 7 मि.ग्रॅ.पेक्षा जास्त होते आणि परिणामी तयार होणारे विविध क्षार सांध्याच्या आतील भागावर व स्नायूंमध्ये साठू लागतात आणि सांधे सुजून सांधे दुखू लागतात त्या संधिवाताच्या प्रकाराला “गाऊट"म्हंटलं जातं.    गाऊट ला जरी श्रीमती आजार म्हंटले जात असले तरी आता तो सर्वच समाजघटका...