गाऊट, खुडरोग, युरीक अँसीड ची वाढ अथवा गाऊटचा संधिवात
गाऊट, खुडरोग, युरीक अँसीड ची वाढ अथवा गाऊटचा संधिवात.....
रक्तातील बिघाड झाल्यामुळे होणार्या सांधेदुखीच्या प्रकारांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे गाऊटचा संधिवात.
गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली होती हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. कारण हा सतत मांसाहार व्यसन करणाऱ्या अव्यवस्थित जीवनशैली असणाऱ्या ना होतो असे म्हंटले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. विविध कारणांनी ज्यावेळी रक्तातील प्युराईनच्या चयापचय क्रियेत बिघाड होऊन रक्तातील ‘युरिक अॅसिड’ या घटकाचे प्रमाण 7 मि.ग्रॅ.पेक्षा जास्त होते आणि परिणामी तयार होणारे विविध क्षार सांध्याच्या आतील भागावर व स्नायूंमध्ये साठू लागतात आणि सांधे सुजून सांधे दुखू लागतात त्या संधिवाताच्या प्रकाराला “गाऊट"म्हंटलं जातं.
गाऊट ला जरी श्रीमती आजार म्हंटले जात असले तरी आता तो सर्वच समाजघटकांना त्रास देताना दिसतोय. आयुर्वेद यास वातरक्तामुळे होणारा आजार असे संबोधते. उच्च प्रथिनयुक्त आहार सतत खाल्ल्याने शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. जास्तीच्या युरीक अॅसिडचा परिणाम रक्तावर होतो. त्याने सांध्याच्या ठिकाणी खास करून हाता-पायांच्या बोटांच्या ठिकाणी सूज येते ही सूज गुडघे घोटे यावर येते. ही सूज म्हणजेच गाऊट अथवा खूडरोग होय. गाऊट होण्याचे खरे कारण हे प्युरीनच्या मेटॅबोलिझममध्ये बिघाड होणे हे आहे. प्युरीन हा घटक बर्याच प्रमाणात जिवंत पेशींमध्ये तसेच बर्याच अन्नपदार्थांमध्ये सापडतो.
मांसाहारी पदार्थात खासकरून मटणामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. प्रथिनांचं पूर्ण पचन झाल्यावर दोन टाकाऊ घटक तयार होतात. एक युरिक अॅसिड व दुसरं युरिया. मद्यपान आणि मांसाहार या दोन कारणांनी शरीरात ‘युरिया’ आणि ‘युरिक अॅसिड’ची निर्मिती वाढते. उन्हाळय़ात किंवा उष्ण प्रदेशात घाम जास्त येतो. अशा वेळी लघवीचं प्रमाण कमी होते. परिणामत: शरीरातील ‘युरिया’ घामातून बाहेर पडतो. तर ‘युरिक अॅसिड’ मात्र लघवीतूनच शरीराबाहेर पडतं.
अतिमांसाहारामुळे शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ते शरीराबाहेर टाकण्याची क्रिया मंदावते. त्याचं उत्सर्जन होत नाही. युरिक अॅसिड अम्लधर्मी आणि उष्ण गुणांचं असतं. शरीराबाहेर न पडल्याने रक्त खराब करतं.
*आयुर्वेदाच्या दृष्टीने हा आजार होण्याची कारणे...*
अतितिखट, आंबट, तळलेले, मसालेदार, पित्त वाढवणारे पदार्थ वारंवार, मांसाहार, अतिमद्यपान करणार्या व्यक्तींनी अतिप्रवास, अतिव्यायाम, धावपळ, कष्टाची कामे जास्त केल्यास या विकाराची अत्पत्ती होते असे आयुर्वेदात म्हंटले आहे.
*का वाढते युरिक अँसीड...*
स्थूलपणा, वाढलेले वजन, उच्च रक्तदाब, रक्तातील चरबीचे प्रमाण जादा असणे, लघवीला साफ होत नसणे, किडनीचे विकार, अतिमद्यपान, काही रासायनिक औषधांचे दुष्परिणाम, अतिप्रवास, पाणी कमी पिणे, इ. कारणांमुळे युरिक अॅसिड उत्सर्जन पुरेसे होत नाही तसेच
हिमोलायटिक अॅनिमिया, सोरीयासिस या विकारांमुळे होणारे रक्तातील बिघाड, चयापचय क्रियेतील दोष, काहीवेळा हार्मोन्समधील असंतुलन यामुळे युरिक अॅसिड व त्याचे रक्तातील प्रमाण वाढू शकते व यामुळे ही गाऊटचा संधिवात होऊ शकतो.याशिवाय अनुवंशिक अथवा फँमिली हिस्ट्रि असल्यास दुसऱ्या पिढीत गिफ्ट स्वरूपात प्राप्त ही होतो. स्त्रीयांना मोनोपाँज नंतर होतो,अँस्पीरीन सारखी औषध, मुत्रल औषधे, हायबीपी, डायबेटीस, मोठे आँपरेशनचे रुग्ण ह्दयविकाराचा त्रास असलेल्या मंडळींना हा त्रास होऊ शकतो.
*गाऊट आजाराची लक्षणं...*
चालता फिरताना त्रास होतो, सांधे सूजतात, जाँईन्टसच्या जागेवर फुगे येतात सूजून खूप वेदना होतात. पायाच्या अंगठ्याचा. हा सांधा खूप सुजतो आणि प्रचंड दुखतो तर कधी एकदमच अनेक सांधे सुजतात. त्यामध्ये टाच, गुडघे, हाताची बोटे आणि कोपर यांचा समावेश असतो.
*युरिक अँसीड वाढल्यास कोणत्या गोष्टी खाऊ नये...*
मका, उडीद डाळ, चण्याची डाळ, राजमा, वाळवलेले कडवे वाल, गोडे वाल, साबुदाणा, भगर, दही वाटाणे, कुळीथ,पालक, चुका अंबाडी, मेथीची भाजी, करडई, डाळींच्या पिठाचे डांगर, उसाचा रस, चिंचेचा वापर, आइस्क्रीम, पाणीपुरी, थंड पदार्थ, नासवलेले पदार्थ, ब्रेड, उडिदाचे पापड, फरसाण, अंबवलेले पदार्थ, हवाबंद डब्यातील पदार्थ, झिंगे, खेकडे, बोकडाचे मटन, भेजा, सुके मासे, हलवा हे पदार्थ टाळावेत. उकडलेली अंडीसुद्धा खाणे शक्यतो टाळावे.
यांचे सेवन युरिक अॅसिडचे प्रमाण तात्काळ वाढवते. युरिक अॅसिडचा त्रास असताना दह्य़ाचे सेवन करू नये. सर्व प्रकारच्या कोशिंबिरी, रायते, फ्रुट सॅलड तसेच दही घालून केलेल्या भाज्यांमुळे युरिक अॅसिडचा त्रास वाढतो. ताकसुद्धा आंबट असल्यास रुग्णांनी टाळावे.
*उपाययोजना...*
* चमचाभर अश्वगंधाची पूड, चमचाभर मध गरम दुधात घालून प्या. उन्हाळ्यात अश्वगंधाचे प्रमाण कमी ठेवावे.
*युरिक असिडमुळे शरीरात गाठी होतात. हे टाळण्यासाठी पाण्यात चमचाभर बेकिंग सोडा घालून प्या. यामुळे गाठी विरघळतात.
*कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस यांचे मिश्रण पिता येईल.
* दररोज नारळपाणी प्यायल्याने ही दूर होते.
*जेवणानंतर चमचाभर जवस चावून खाता येईल.
*सफरचंद यातील मँलिक अँसिड यूरिक अँसिडची मात्रा नष्ट करते.
*बेलाच्या पानाचा रस पाव कप घेणे.
*गाजराचा ,टाँमँटो चा रस घ्यावा.
*अर्धा चमचा सोडा मधातून घेणे तीन वेळा घेणे.
*सोडा टँबलेटस पाण्यात घालून पिणे अथवा सोडा घेणे.
*पांढऱ्या कांद्याचा रस घेणे,व लसूण रस समभाग घेणे.
*मोहरीचे तेल हलकेच दुखर्या भागावर लावून जिरवणे.
व खालील औषध घेणे
Comments
Post a Comment