गाऊट, खुडरोग, युरीक अँसीड ची वाढ अथवा गाऊटचा संधिवात
गाऊट, खुडरोग, युरीक अँसीड ची वाढ अथवा गाऊटचा संधिवात..... रक्तातील बिघाड झाल्यामुळे होणार्या सांधेदुखीच्या प्रकारांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे गाऊटचा संधिवात. गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली होती हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. कारण हा सतत मांसाहार व्यसन करणाऱ्या अव्यवस्थित जीवनशैली असणाऱ्या ना होतो असे म्हंटले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. विविध कारणांनी ज्यावेळी रक्तातील प्युराईनच्या चयापचय क्रियेत बिघाड होऊन रक्तातील ‘युरिक अॅसिड’ या घटकाचे प्रमाण 7 मि.ग्रॅ.पेक्षा जास्त होते आणि परिणामी तयार होणारे विविध क्षार सांध्याच्या आतील भागावर व स्नायूंमध्ये साठू लागतात आणि सांधे सुजून सांधे दुखू लागतात त्या संधिवाताच्या प्रकाराला “गाऊट"म्हंटलं जातं. गाऊट ला जरी श्रीमती आजार म्हंटले जात असले तरी आता तो सर्वच समाजघटका...