मूळव्याध व प्रकार व उपचार
मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला / असलेले कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात.
बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो आणि रुग्णाला काही लक्षणे जाणवत नाहीत. लक्षणे जाणवत असल्यास बहुतेक वेळा ती खालील स्वरूपाची असतात –
- शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.
- गुदद्वाराजवळ खाज
- गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो
मूळव्याध होण्याची कारणे:
मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो –
- वाढलेले वजन
- ४५ वर्षांपेक्षा जास्त वय
- गर्भावस्था
- अनुवांशिकता
मूळव्याधीची लक्षणे बरेचदा उपचाराशिवायही काही दिवसात बरी होतात . गर्भावस्थेदरम्यान झालेली मूळव्याध बाळाच्या जन्म दिल्या नंतर बरी होते. परंतु गुदद्वाराच्या जवळ आणि आत असण्याऱ्या रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे आवश्यक आहे –
- आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवणे – फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.
- भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे.
- शौचाची भावना झाल्यानंतर शौचास जाण्यास उशीर करू नये. असे केल्यामुळे शौच अधिक कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर करावा लागू शकतो.
- काही औषधांमुळे (उदा: कोडीन असलेली वेदनाशामक औषधे) बद्धकोष्ठ होतो. अशी औषधे घेणे शक्यतो टाळावे.
- वजन नियंत्रणात ठेवावे.
- नियमित व्यायाम – यामुळे बद्धकोष्ठ टाळण्यास मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
या बदलांमुळे मूळव्याध होण्याचा किंवा पुन्हापुन्हा होण्याचा धोका कमी होऊ शकतो. आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले मलम गुदद्वाराजवळ आणि आत लावल्यास आपल्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते तसेच शौच करणे सुलभ होते. .
जर आपली लक्षणे जास्त गंभीर असतील तर त्यावरील उपचारांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
मूळव्याधीची मुख्य लक्षणे:
बहुतेक वेळा मूळव्याधीची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि उपचाराशिवाय काही दिवसात बरी होतात. काही लोकांना लक्षणे न जाणवल्यामुळे मूळव्याधीचा त्रास आहे हे देखील समजलेले नसते.
परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवू शकतात –
- शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.
- गुदद्वाराजवळ खाज
- गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो
- शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे
- गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे
मूळव्याधीला रक्तपुरवठा कमी पडल्याशिवाय किंवा थांबल्याशिवाय मूळव्याध दुखत नाही.
मूळव्याध होण्याची कारणे:
मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. दाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात व सुजतात.
मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो –
- अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा
- आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत बद्धकोष्ठ असणे.
- दीर्घकालीन जुलाब
- सतत जड वस्तू उचलणे
- सतत खोकला किंवा वारंवार उलट्या
- बैठी जीवनशैली
- गर्भावस्था – बाळाच्या जन्मानंतर बरेचदा रक्तस्त्राव थांबतो.
- ४५ वर्षापेक्षा जास्त वय – जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीराचे स्नायू, रक्तवाहिन्या व आधार देणारे इतर अनेक घटक कमकुवत होत जातात आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढत जातो.
- अनुवंशिकता
मूळव्याधीचे प्रकार:
गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी किंवा प्रोक्टोस्कोपीनंतर डॉक्टर रुग्णाला कोणत्या प्रकारची मूळव्याध आहे सांगू शकतात.
- पहिली पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली लहान सूज / कोंब. ही सूज बाहेरून दिसत नाही.
- दुसरी पायरी – गुदद्वाराच्या आतील बाजूस आलेली थोडी मोठी सूज / कोंब. शौचाच्या वेळी ही सूज बाहेर येते.
- तिसरी पायरी – गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या एक किंवा अधिक लहान गाठी. या गाठी पुन्हा आत ढकलता येतात.
- चौथी पायरी – गुदद्वारातून बाहेर लटकलेल्या एक किंवा अधिक थोड्या मोठ्या गाठी. या गाठी पुन्हा आत ढकलता येत नाहीत.
मूळव्याधीचा प्रकार समजून घेणे हे सर्वोत्तम उपचारासाठी आवश्यक आहे.
मूळव्याधीवरील उपचार:
मूळव्याधीचा त्रास बरेचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात बरा होतो. परंतु गुदद्वाराजवळील खाज आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.
सर्वप्रथम आहारातील बदल आणि शौचाच्या वेळी जोर न करणे हे सांगितले जाते.
आहारातील बदल व स्वतः घ्यायची काळजी –
आपल्याला होणारा मूळव्याधीचा त्रास बद्धकोष्ठामुळे असेल तर शौच नियमित व सुलभ होणे आवश्यक आहे. यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागणार नाही.
- यासाठी आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवावे – फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.
- भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे.
शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी –
- शौचाच्या वेळी कुंथू नये / जोर करु नये.
- शौचानंतर मऊ toilet paper वापरावा.
- शौचानंतरची स्वच्छता हळुवारपणे करावी.
फिशर / गुदद्वाराजवळ जखम होणे
फिशर म्हणजे काय?फिशर म्हणजे गुदद्वाराच्या खालच्या बाजूला त्वचेजवळ जखम होणे / भेग पडणे. कठीण शौच असेल तर गुदाशयाच्या आतील नाजूक आवरणावर दाब पडून किंवा पातळ शौचाच्या वेळी जोर केल्यामुळे फिशर होते.
फिशरची लक्षणे कोणती आहेत?
• वेदना: रुग्णाला शौचाच्या वेळी व शौचानंतर वेदना होतात. फिशरच्या वेदना अतिशय तीव्र असतात. या वेदना काही मिनिटे ते काही तास टिकतात. गुदद्वाराच्या भोवती गोलाकार असलेले स्नायू आकुंचन पावल्यामुळे या वेदना होतात. या वेदना इतक्या तीव्र असतात की रुग्णाच्या शौचाला जाण्याची भीती वाटू लागते आणि त्यामुळे बरेच रुग्ण शौचाला जाण्याचे टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु यामुळे बद्धकोष्ठ होऊन शौच कठीण होते व आणखी वेदना होतात.
• रक्तस्त्राव: शौचाच्या वेळी त्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.
• अतिरिक्त त्वचा: काही वेळा फिशरजवळ किंवा त्याभोवती सूज येऊन अतिरिक्त त्वचा तयार होते व लटकू लागते. बरेचदा यातून चिकट स्त्राव येतो आणि त्यामुळे त्वचा खरचटल्यासारखी होते व खाजते.




Comments
Post a Comment