मणक्यातील ग्याप ,झिज,सांधे दुखी
*🧎🏾♂️मणक्याचे आजार*🚶♂️
---------------------------------------------
मणक्यातील ग्याप ,झिज,सांधे दुखी, गुढगे दुखी, कंबर दूखी, पाठीचे आजार, कॅल्शियम ची कमतरता, पाय सुंद्द किंवा मांडी घालून बसता न येणे, डोके गरगरणे, चक्कर येणे, हातापायात मुंग्या येणे यासाठी .....
*या संदर्भात अधिक माहिती*---
सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्यासाठी - जवस, तीळ, आळीव, गव्हाच्या एवढा चुना, बाभळीच्या शेंगा बिया सकट वाळवून त्याचे चूर्ण तयार करा. चुर्ण दोन वेळ मधा सोबत न चुकता घ्या......
गुडघेदुखी व इतर मणक्याचे आजार कायमस्वरूपी दुरुस्ती होण्यासाठी
🧎🏾♂️ *ही पोस्ट सविस्तर वाचा*🧎🏾♂️
*कारणे व उपचार*
बदललेली जीवनशैलीमुळे
आज़ 50 वर्षी च्या वरील खूप लोकांना भेडसावणारी समस्या. चुकीच्या सवयी, व्यसन, आरोग्याकडे दुर्लक्ष.
*आजाराची लक्षणे*
हात बधिर होणे, खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत मुग्या येणे, लक्षणे दिसून येतात. मणक्याचा आजार झालेल्या रुग्णामध्ये कंबरेच्या किंवा मानेच्या मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ कमी झाल्यामुळे दोन मणके हे एकमेकांवर घासल्याने दुःखणं तयार होते. मणक्याची झीज होऊन त्या ठिकाणी गॅप तयार होतो, मणक्यातील गादी घासली जाते.
त्यामुळे मुंग्या येतात किंवा दुखते, कंबरेत दुखणे,हाता पायांना मुग्या येणे. सकाळी उठताना त्रास होणे. चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे.पायाच्या मागील बाजूने कंबरेपर्यंत शीर दुखणे. मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे.शौचाला बसता न येणे. चक्कर येणे.
---------------------------------------
*आजार होण्याची कारणे*
डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर करणे खांद्यावर किंवा पाठीवर जड वजनाच्या वस्तू उचलणे. खड्डे असलेल्या रस्त्यावरून सतत मोटारसायकलवरून प्रवास करणे. अपघातामुळे मणक्याला इजा होणे, सतत बैठे काम करणे. पोट साफ न होणे, सतत वेदनाशामक औषधी खाणे.स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा. गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे. जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ अधिक असणे उदा. वांगे, बटाटे, हरभरा डाळ, वाटाणे, तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ इ. अनेक कारणांमुळे शरीरात वात दोष वाढून दोन मणक्यातील वंगणासारखा स्निग्ध पदार्थ कमी होऊन मणक्याचे आजार उद्भवतात. संकरीत धान्य व फवारलेले धान्य तसेच पालेभाज्या यामुळे हाडांना ठिसूळपणा येतो
मणक्यातील हाडे ठिसूळ होण्याला व्यायामाचा अभाव , कायमस्वरूपी ताण तणावात राहणे अशी अनेक कारणे आहेत.
आयुर्वेदामध्ये मणक्यांच्या विकारावर अत्यंत उपयुक्त व स्थायी स्वरूपाचे *पंचकर्म* उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदातील काही मूलभूत तत्त्वे अंगीकारल्यास मणक्यांचे होऊ घातलेले विकार आपण टाळू शकतो.
बरे होऊ शकतो
*आयुर्वेद उपचार*
सुरुवातीस बरेच दिवस वेदनाशामक औषधी खाऊन रुग्ण आयुर्वेदाकडे येतो. वेदनाशामक औषधींनी तात्पुरते बरे वाटते, परंतु वेदनाशामक औषधी ही काही मणक्याच्या आजाराची परिपूर्ण चिकित्सा नाही. वेदनाशामक औषधी घेणे, शरीराला वजन बांधणे व ऑपरेशन करणे, हा क्रम ठरलेलाच. परंतु आयुर्वेदीय पंचकर्माद्वारे बरीच मणक्याची ऑपरेशन निश्चित टळू शकतात.
*पंचकर्मामध्ये*
सर्वांग स्नेहन- बॉडी मसाज
सर्वांग स्वेदन- स्टीम बाथ
यामुळे शिरा मोकळ्या होण्यास मदत होते, वात कमी होतो. स्नायूंना आलेला कठीणपणा (stiffness)
नष्ट होऊन ते लवचिक होतात.
बस्ती - वात दोषावरील प्रमुख व खात्रीशीर उपचार मणक्याच्या विकारात प्रामुख्याने तिक्तक्षिर घृत बस्ती, वाटर बस्ती, काढा बस्ती, मज्जा बस्ती या बस्ती प्रकारांचा अद्भुत लाभ होतो. नियमित वर्षातून एक किंवा दोन वेळा वरील बस्ती घेतल्यास व्याधी पुन्हा पुन्हा होत नाही. कटी बस्ती, मन्या बस्ती - कंबर व मान या प्रदेशी औषधी सिद्ध तेल काही काळ ठेवले जाते. या सर्व बस्ती प्रकारामुळे हाडांची झीज भरून येण्यास मदत होते. मणक्यामधील वंगणासारखा पदार्थ तयार होण्यास मदत होते.
*पोटली मसाज* -
या उपचारामध्ये विविध वातशामक औषधी उदा. एरंडपत्र, निर्गुडीपत्र, शिग्रुपत्र, चिंचपत्र इत्यादी पानाची पोटली करून शेक दिला जातो.
*नस्य -*
या उपचारादरम्यान नाकामध्ये औषधी सिद्ध तूप किंवा तेल नाकात सोडले जाते. यामुळे मानेच्या मणक्यांचा गॅप भरून निघतो
तसेच विविध आयुर्वेदिक उपचार, सुवर्ण कल्प, नैसर्गिक कॅल्शियम कल्प वातनाशक औषधींनी मणक्याच्या आजारावर मात केली जाऊ शकते. आहार.गहू,नाचणी,उडीद,लसूण,आलेएरंड तेलाची चपाती.
*योगासन* :
भुजंगासन, पादपश्चिमोत्तासन, धनुरासन, सुप्तरासन, पवनमुक्तासन इत्यादी योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
*प्राणायाम* :
अनुलोम विलोम15 मीनीट कपालभाती 15 मीनीट
*पथ्य-*
*काय करु नये-काय खाऊ नये*.
वांगे,बटाटे,हरबरा डाळ,वाटाणे,चवळी,वाल,अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावीत.अति परिश्रमाची कामे टाळावीत,जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.आंबट रसामुळे हाडांची व मणक्यातील चकत्यांची झीज लवकर होते.जड वजनाच्या वस्तू उचलू नये.आंबट पदार्थ,दही,चिंच व आम्ल रसाचे पदार्थ उदा.इडली,ढोकळा,पाव,डोसा बंद करावे.आतापर्यंत अनुभवातून अनेक
*रुग्णांना ऑपरेशन शिवाय गुण देण्यास यश मिळाले आहे*.
तेल मसाजव्दारे सांध्यास खोलवरील स्नायूस उपयुक्त ठरते.गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे सांध्यातील वेदना घालवणे शक्य आहे.
*तेल बनवण्याची पद्धत*
मोहरी तेल1000 ml एरंड तेल 250 ml तीळ तेल 250 mlकोरपड 500 gramपारीजात चे फुले व पाणे 500 gramनिर्गुडीपत्र,500 gramमेथी पावडर 250gramओवा 100gram
*आवळा पावडर 100gram10लवंग gram100 लसुन gram
सर्व एकत्र करून एक तास ऊकळून
घ्या थंड करून,काचेच्या बाटलीत भरुन ठेवा व कुठल्याही सांधे दुखी व मुका मार यावर उपाय चालेल ....
गरम पाण्याच्या पिशवी ने शेक देणे. पुरक व्यायाम , योग निसर्गोपचार आणि ऍक्युपंक्चर/ एक्युप्रेशर* मधे मणक्या संदर्भ *व्याधीचे उच्चाटन केले जाते. स्नायूसंधींना बल प्राप्त करुन देणारी उपचार पद्धती आहे*.
------------------------------------
📍गोरक्ष मोहिते-पाटील
ऍक्युपंक्चारीस्ट्..*
* योग-नॅचरोपॅथी -----*
-------------------------------------
*घरगुती उपाय*
जवस 1 चमचा, तिळ 1चमचा, आवळा पावडर,1चमचा अश्वगंधा पावडर, 1/2चमचा , मेथी पावडर 1चमचा रोज सकाळी संध्याकाळी घ्या
*गव्हा एवढा खायचा चुना*
दुध दही किंवा कोमट पाणी सोबत घ्या. *बाभळीच्या शेंगा बियांसह 500 ग्राम घ्या वाळवुन चुर्ण बनवुन घ्या रोज आर्धा चमचा चुर्ण दोन वेळ मधा सोबत घ्या.*
सर्व उपचार रुग्णांनांनी आपल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावेत ..
--------------------------------------------
*अधिक माहितीसाठी व उपचार*
(फक्त नोंदणीकृत रुग्णां करीता)
8459948301
9011441993
----------------------------------------
Comments
Post a Comment