emergency heart attack

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*
*रुग्णालयात हृदयाचे ठोके बंद पडलेल्या रुग्णाची छाती डॉक्टर वारंवार का दाबतात ?*
*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

प्रत्यक्षात असे तुम्ही दवाखान्यात पाहिले नसेल तरी एखाद्या चित्रपटात नक्कीच पाहिले असेल. हृदयाचे कार्य आपणास ठाऊक आहे. एखाद्या पंपाप्रमाणे हृदय सर्व शरीरभर दाबाखाली रक्त वाहून नेण्याचे कार्य करत असते. हृदय ७२ वेळा आकुंचन प्रसरण पावते. आकुंचन प्रसरण होण्याची प्रेरणा हृदयाच्या स्नायूत असलेल्या प्रेरणा स्रोतापासून (पेसमेकर किंवा सायनो अ‍ॅट्रीयल नोड) मिळत असते. हा प्रेरणा स्रोत बिघडल्यास वा कार्य करायचे थांबल्यास हृदयाचे कार्य बंद पडते. 

काही वेळा हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांतील बिघाडामुळे हृदयाला पोषण मिळत नाही व ते कार्य करण्याचे थांबते. हृदयाच्या प्रेरणा स्रोताचे कार्य हे विद्युत रासायनिक प्रक्रियांवर अवलंबून असते.

बंद पडलेले हृदय चालू करण्यासाठी एकतर नवीन पेसमेकर वा प्रेरणा स्रोत शस्त्रक्रिया करून बसवावा लागतो. काही वेळा इलेक्ट्रीक शॉक देऊन हृदय सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. 

हाताने छातीवर जोरात दाब दिल्याने हृदयावर दाब येतो व ते आकुंचन पावते व रक्त शरीराकडे नेले जाते. अशा वारंवार दाब देण्यामुळे काही वेळा बंद पडलेले हृदय परत चालू होऊ शकते. मुख्य म्हणजे ह्यासाठी कोणत्याही उपकरणांची, औषधांची गरज नसल्याने हा उपचार कोठेही करता येतो.

*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*    

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹
*join होण्यासाठी 7498245822 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा* 
*किंवा लिंकला टच करा व join व्हा👇*


Comments